Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
लग्नाआधी छान, सुंदर असलेली बाहुली,
लग्नानंतर बाहुबली कधी होते
ते लक्षातच येत नाही!
- एक थोर विचारवंत.
…
जे म्हणतात ना,
आमची पार वरपर्यंत ओळख आहे…
त्यांना एक विनंती आहे,
जरा तो पाऊस तेवढा बंद करा!
लय उपकार होतील बाबांनो!
…
केवळ प्रेमात पडल्यावरच नव्हे,
तर…
मोबाइलची चार्जिंग संपल्यावरही
लोक वेड्यासारखे वागतात!
…
पुरुष कितीही मोठा धाडसी असू द्या…
पण १५०० रुपयांची साडी ३०० रुपयांमध्ये मागायचं धाडस फक्त
एक बाईच करू शकते!