Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पिंटू - तू दर शुक्रवारी बायकोशी भांडतोस आणि
सोमवारी तिची समजूत काढतोस, असं का?
बंड्या - ही एक छोटीशी बचत योजना आहे.
ज्यामुळं शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या वायफळ खर्चापासून सुटका होते.
तुला कळणार नाही!
…
आम्ही सुद्धा ऑलिम्पिकमध्ये गेलो असतो…
देशासाठी मेडल जिंकली असती, पण…
आमच्या PT च्या तासाला गणिताचे सर येऊन शिकवायचे!
…
महान लोकांच्या आयुष्यात अडचणी या असतातच!
नाहीतर राम वनवासात,
कृष्ण बंदिवासात,
आणि मला रोज उठून कामावर कशाला जावं लागलं असतं?