Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बायकोनं नवऱ्याला धु-धु धुतला!
कारण, उदबत्ती लावताना बायकोकडं बघून तो एवढंच म्हणाला की…
घरातली पीडा बाहेर जाऊ दे…
बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे…
…
कंडक्टर - बाई, मुलाचं वय किती?
बाई - धाकटा २ वर्षे, मधला अडीच वर्षे आणि थोरला ३ वर्षे
कंडक्टर - बाई वय कमी सांगायचं तर सांगा.
पण गॅप तरी ९ महिन्यांचा ठेवा!
बाई - धाकटा जावेचा आहे मुडद्या… आणि मधला नंणदेचा…
जास्त शहाणपणा शिकवू नकोस. तिकीट दे…
आला मोठा फॅमिली प्लानिंग शिकवायला!
…
बायको - माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता तर सुखी झाले असते…
नवरा - काय सांगतेस, तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला.
बायको - हो.
नवरा - अरेरे… मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो.