marathi jokes : मुलीची छेड काढल्याबद्दल जेव्हा ८० वर्षांचा म्हातारा आरोपी म्हणून न्यायालयात येतो…-joke of the day viral marathi jokes marathi short jokes jokes on husband wife jokes on teacher student chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : मुलीची छेड काढल्याबद्दल जेव्हा ८० वर्षांचा म्हातारा आरोपी म्हणून न्यायालयात येतो…

marathi jokes : मुलीची छेड काढल्याबद्दल जेव्हा ८० वर्षांचा म्हातारा आरोपी म्हणून न्यायालयात येतो…

HT Marathi Desk HT Marathi
Sep 10, 2024 12:22 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : मुलीची छेड काढल्याबद्दल जेव्हा ८० वर्षांचा म्हातारा आरोपी म्हणून न्यायालयात येतो…
marathi jokes : मुलीची छेड काढल्याबद्दल जेव्हा ८० वर्षांचा म्हातारा आरोपी म्हणून न्यायालयात येतो…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

न्यायाधीश - या वयात मुलीची छेड काढतोस, 

माफ करायच्या लायकीचाही नाहीस तू

८० वर्षांचा म्हातारा - साहेब, ऐकून तरी घ्या माझं

न्यायाधीश - काय ऐकून घ्यायचं तुझं?

म्हातारा - साहेब ६० वर्षे जुनी केस आहे ही.

तारखावर तारखा पडल्यामुळं आजपर्यंत सुरू आहे

जिची छेड काढली होती ती सुद्धा आलीय.

तिच्या नातवांना घेऊन

वेड्यांमध्ये किती सुधारणा झालीय हे तपासण्यासाठी वेड्यांच्या हॉस्पिटलमधील डॉक्टर एकदा डीजे लावतात…

डीजे लागताच सगळे वेडे बेभान होऊन नाचायला लागतात

फक्त एक जण बाजूला शांत बसलेला असतो.

डॉक्टरांना वाटतं हा हुशार आहे.

डॉक्टर त्याला विचारतात की, तू का नाचत नाहीस?

वेडा म्हणतो, मी नवरदेव आहे ना!

गोरा होण्यासाठी मी क्रीम आणि साबण लावणं सुरू केलंय.

एकदा का गोरा झालो की 

या मुलींकडं तसंच दुर्लक्ष करणार

जशा त्या आता माझ्याकडं करतात!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner
विभाग