marathi jokes : बायको माहेराहून परत आल्यावर नवरा जेव्हा दरवाजातच जोरजोरात हसू लागतो!-joke of the day viral marathi jokes marathi short jokes jokes on husband wife jokes on teacher student chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : बायको माहेराहून परत आल्यावर नवरा जेव्हा दरवाजातच जोरजोरात हसू लागतो!

marathi jokes : बायको माहेराहून परत आल्यावर नवरा जेव्हा दरवाजातच जोरजोरात हसू लागतो!

HT Marathi Desk HT Marathi
Sep 09, 2024 12:33 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : बायको माहेराहून परत आल्यावर नवरा जेव्हा दरवाजातच जोरजोरात हसू लागतो!
marathi jokes : बायको माहेराहून परत आल्यावर नवरा जेव्हा दरवाजातच जोरजोरात हसू लागतो!

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

एक मुलगी स्कूटी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवायला पोलीस ठाण्यात जाते…

पोलीस - नंबर सांगा.

मुलगी - सॉरी माझा बॉयफ्रेंड आहे.

पोलीस - ओ मॅडम, तुमच्या स्कूटीचा नंबर सांगा!

सापडला!

ATM चा मराठी अर्थ सापडला!

A - असतील

T - तर

M - मिळतील

बायको माहेराहून परत येते!

नवरा दरवाजा उघडतो आणि जोरजोरात हसायला लागतो…

बायको विचारते, असं का हसताय?

नवरा म्हणतो, गुरुजींनी सांगितलं आहे की,

संकटाचा सामना हसत हसत करा!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner