marathi jokes : घरी आलेल्या पाहुण्यांना जेवणाचं विचार, असं जेव्हा नवरा बायकोला सांगतो…-joke of the day viral marathi jokes marathi short jokes jokes on husband wife jokes on teacher student chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : घरी आलेल्या पाहुण्यांना जेवणाचं विचार, असं जेव्हा नवरा बायकोला सांगतो…

marathi jokes : घरी आलेल्या पाहुण्यांना जेवणाचं विचार, असं जेव्हा नवरा बायकोला सांगतो…

HT Marathi Desk HT Marathi
Sep 07, 2024 09:32 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : घरी आलेल्या पाहुण्यांना जेवणाचं विचार, असं जेव्हा नवरा बायकोला सांगतो…
marathi jokes : घरी आलेल्या पाहुण्यांना जेवणाचं विचार, असं जेव्हा नवरा बायकोला सांगतो…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

मला एक कळत नाही…

संतूर साबणाच्या जाहिरातीत

लहान मुलांच्या आईच का दाखवतात?

बाप का दाखवत नाहीत?

बाप काय निरम्यानं आंघोळ करतो का?

नवरा - अगं ऐकलंस का? 

घरात पाहुणे आलेत त्यांना जेवणाचं विचार जरा.

बायको - भावजी, तुम्ही जेवून आलात की घरी जाऊन जेवणार?

पाहुणा - नाही मी इथंच जेवणार आहे.

बायको - अच्छा, डबा घेऊनच आलाय का?

पाहुणा - हो. डबा पण भरून घेऊन जाणार हाय.

दूधवाले संप करतात तेव्हा गाडीतनं दूध बाहेर फेकतात…

भाजीवाले संप करतात तेव्हा भाज्या रस्त्यावर फेकून देतात…

ह्या बँकवाल्यांना कधी कळणार काय माहीत?

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner
विभाग