Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
(लग्नाच्या पूजेच्या वेळी)
नवरदेव - गुरुजी, पत्नीला माझ्या डावीकडे बसवू की उजवीकडे
गुरुजी - तुझ्या सोयीनुसार बघ.
नाहीतरी नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे!
…
प्रश्न - बायको माहेरी गेल्यावर नवऱ्याला रोज फोन का करते?
उत्तर - कारण नवऱ्याला आठवण राहिली पाहिजे की…
टायगर अभी जिंदा है!
…
हेही वाचा : आम्ही व्यायामशाळेत जात नाही कारण…
शेजारच्या काकू सारख्या घरात जायच्या, बाहेर यायच्या.
मला राहवेना म्हणून विचारलं, काकू अशा सारख्या आत-बाहेर का करताय?
काकू म्हणाल्या, अरे बंड्या
माझी सून टीव्हीवर बघून योगा शिकतेय.
तो रामदेवबाबा सारखा सांगतोय
सास को अंदल लो
सास को बाहर निकालो!
मला नको-नको करून ठेवलंय!
…
आमच्या प्रेमाची कहानी फार छोटी आहे!
ती पावसासारखी आली आणि
मी सोयाबीनसारखा बरबाद झालो!