Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
शाळेच्या मागील नदीत गुरुजी बुडत होते…
चम्यानं बघितलं!
त्यांच्या अंगात वीज संचारली! अंगात जोश आला
काही क्षणात त्यानं दफ्तर खाली टाकलं!
अंगातला शर्ट काढला…
शर्ट हवेत फिरवत तो ओरडत पळत सुटला!
उद्या सुट्टी आहे…
उद्या सुट्टी आहे…
…
एका मुलीचं नवीन लग्न झालं!
ती काम करताना तिची सासू सतत आजूबाजूला घिरट्या घालायची!
पण काही बोलायची नाही!
एक दिवस सून भांडी घासत असताना सासू बोललीच!
प्लेट घासल्यावर त्यात चेहरा दिसायला हवा इतकी स्वच्छ करत जा!
सूनेनंही संधी साधली! म्हणाली,
उद्यापासून आरशावरच जेवत जा!
…
परदेशात कोणी आजारी पडला तर
'गेट वेल सून' असं म्हणण्याची पद्धत आहे!
जेणेकरून कोणी आजारी माणूस लवकर बरा व्हावा!
आपल्या गावाकडं कुणी आजारी पडलं तर लोक म्हणतात,
काळजी घ्या! आमचा बाजूवाला ह्याच आजारानं गेला होता!