Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
नवरा नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला!
तेवढ्यात बायको म्हणाली…
घरातून बाहेर पडताना देवासमोर हात जोडत जा, सगळी कामं चांगली होतात.
नवरा - यावर माझा विश्वास नाही.
लग्नाच्या दिवशी सुद्धा देवाला हात जोडूनच घराबाहेर पडलो होतो.
…
मीडियाच्या कंपनीत नोकरीसाठी मुलाखती सुरू होत्या.
मुलाखत देणारे एका मागोमाग एक आत जात होते, बाहेर येत होते.
मुलाखतकार अवघड प्रश्न विचारून सगळ्यांना भंडावून सोडत होता.
शेवटी पिंट्याचा नंबर आला!
पिंट्या एकदम अपटूडेट आला होता. सफेद शर्ट, टाय वगैरे लावून होता.
पिंट्याची पर्सनॅलिटी बघून मुलाखतकार खूष झाले.
हा माणूस कामाचा वाटतो असं त्यांचं पहिलं इम्प्रेशन होतं.
प्रश्नोत्तराला सुरुवात झाली.
मुलाखतकार - मला सांगा, वर्तमानपत्र आणि रेडिओमध्ये काय फरक आहे?
पिंट्या - (थोडा विचार करून) सर, वर्तमानपत्र आणि रेडिओमध्ये एक मूलभूत फरक आहे. हा फरक समजून घेतला तर अनेकांच्या अनेक गोष्टी सुकर होतील.
मुलाखतकार प्रभावित झाले. इतका विचार करून उत्तर देणारा पिंट्या पहिला उमेदवार होता.
मुलाखतकार - तो फरक कोणता?
पिंट्या - सर, वर्तमानपत्रामध्ये तुम्ही चपात्या गुंडाळू शकता, रेडिओमध्ये ते शक्य नाही.
मुलाखतकार अजूनही धक्क्यात आहे…