marathi jokes : दोन व्याही जेव्हा बऱ्याच दिवसांनंतर एकत्र ड्रिंक घ्यायला बसतात…-joke of the day viral marathi jokes marathi short jokes jokes on husband wife jokes on teacher student chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : दोन व्याही जेव्हा बऱ्याच दिवसांनंतर एकत्र ड्रिंक घ्यायला बसतात…

marathi jokes : दोन व्याही जेव्हा बऱ्याच दिवसांनंतर एकत्र ड्रिंक घ्यायला बसतात…

HT Marathi Desk HT Marathi
Aug 28, 2024 10:03 AM IST

Marathi Short Jokes :हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : दोन व्याही जेव्हा बऱ्याच दिवसांनंतर एकत्र ड्रिंक घ्यायला बसतात…
marathi jokes : दोन व्याही जेव्हा बऱ्याच दिवसांनंतर एकत्र ड्रिंक घ्यायला बसतात…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

लहानपणापासून लग्न होईपर्यंत…

मुलीला आई-वडिलांचे जे काही नियम आणि शिस्त सहन करावी लागते…

त्या सगळ्याचा बदला लग्न झाल्यानंतर 

ती नवऱ्याकडून घेते!

संताला बंता गप्पा मारत बसले होते…

संता - मला सांग, जगातील सर्वात पहिला जीव कोणता?

बंता - झेब्रा

संता- कसा?

बंता - तो ब्लॅक अँड व्हाइट असतो ना?

दोन व्याही ड्रिंक घ्यायला बसले…

मुलाचे बाबा - पाणी किती टाकू?

मुलीचे बाबा - नो वॉटर

मुलाचे बाबा - का?

मुलीचे बाबा - आमच्यामध्ये मुलीच्या घरचं पाणीही पीत नाहीत.

ह्याला म्हणतात संस्कार

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग