Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
मी तिला तीन-चार वेळा फोन केला, पण
तिनं फोन उचलला नाही!
नंतर तिला एकच मेसेज केला…
बॅलन्स आला का? ४९९ चा रिचार्ज टाकलाय!
तिनं आतापर्यंत २० वेळा फोन केला.
पण मी उचलला नाही!
…
मनुष्याची जीभ उत्तम चित्रकार असते.
जे पाहिले नाही, तेही ती उत्तम रंगवून सांगू शकते…
…
नवरा - आज भाकरी जरा जाड झालीय का?
बायको - (संतापून) बाहेर बर्गर जबडा वासून खाता आणि घरात
भाकरी आणि बायको दोन्ही पातळ पाहिजे!