Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बायको - आपलं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही मला खूप वेगवेगळ्या नावांनी बोलवायचा?
माझी रसमलाई, माझी रबडी, माझी बर्फी… असं काय-काय म्हणायचात
आता तसं काहीच बोलत नाही
नवरा - दूधाची मिठाई किती दिवस ताजी राहणार?
…
रेल्वे फलाटावर टीसीनं बंड्याला पकडलं आणि तिकीट मागू लागला…
टीसी - तिकीट दाखव…
बंड्या - पण मी ट्रेननं आलोच नाही!
टीसी - तू ट्रेननं आला नाहीस याचा पुरावा काय?
बंड्या - पुरावा हा की माझ्याकडं तिकीट नाही
…
बायको - अहो, ऐकलं का?
नवरा - हा बोल!
बायको - दोन किलो वाटाणे घेऊ?
नवरा - हा घेऊन टाक.
बायको - तुमची परवानगी मागत नाही. तुम्हाला एवढे एकावेळी सोलायला जमतील का ते विचारतेय?