marathi jokes : जन्मजन्मांतरीचं नातं खरं असतं का असं जेव्हा एक नवरा महाराजांना विचारतो…-joke of the day viral marathi jokes marathi short jokes jokes on husband wife jokes on teacher student chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : जन्मजन्मांतरीचं नातं खरं असतं का असं जेव्हा एक नवरा महाराजांना विचारतो…

marathi jokes : जन्मजन्मांतरीचं नातं खरं असतं का असं जेव्हा एक नवरा महाराजांना विचारतो…

HT Marathi Desk HT Marathi
Aug 25, 2024 02:33 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : जन्मजन्मांतरीचं नातं खरं असतं का असं जेव्हा एक नवरा महाराजांना विचारतो…
marathi jokes : जन्मजन्मांतरीचं नातं खरं असतं का असं जेव्हा एक नवरा महाराजांना विचारतो…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

बंड्या एकदा सासुरवाडीला गेला…

सासूबाईंनी मुलीसोबत बंड्यालाही एका सत्संगाला घेऊन गेल्या.

प्रवचन करता-करता महाराज म्हणाले,

ज्याला स्वर्गात जायचं आहे. त्यांनी हात वर करा!

बंड्याच्या बायकोनं आणि सासूनं हात वर केला.

स्वामींनी बंड्याला विचारलं, तुम्हाला स्वर्गात जायची इच्छा नाही का?

बंड्या - गुरुजी, ह्या दोघी निघून गेल्या की हाच स्वर्ग वाटायला लागेल.

स्वामी खूष झाले. त्यांनी लगेच बंड्याला शिष्य करून घेतलं!

बायकोवर वैतागलेला पती एकदा एका महाराजांकडं गेला…

महाराज, मला एक सांगा. 

हे जन्मजन्मांतरीचं नातं खरं असतं का?

महाराज - हो. शंभर टक्के खरं आहे.

नवरा - म्हणजे पुढच्या जन्मात सुद्धा मला हीच बायको मिळणार का?

महाराज - हो. म्हणजे काय?

नवरा - अरे देवा! म्हणजे आत्महत्या करूनही फायदा नाही…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग