Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
दुपारी झोप काढल्यानंतरही रात्री ज्याला मस्त झोप लागते…
त्याचं जगात कुणीच काही वाकडं करू शकत नाही!
…
भिकारी - आधी तुम्ही मला १०-१० रुपये द्यायचा. आता एकच रुपया देता.
ऑफिसर - अरे बाबा तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं.
आता मला मुलंबाळं आहेत.
भिकारी - लाज नाही वाटत?
माझ्या वाटणीचे पैसे स्वत:च्या बायका-मुलांवर खर्च करतोस!
…
बायको (नवऱ्याला) : जा गच्चीवर जाऊन बसा.
नवरा : पण गच्चीवर खूप ऊन आहे!
बायको: मी सांगतेय ना… जा गच्चीवर.
नवरा : अगं पण तिथं काय आहे?
बायको : काही नाही!
घरी बसून तुम्ही माझ्यापेक्षा गोरी झालाय!
(नवरा गुपचूप गच्चीवर गेला)