Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पाण्यातला बगळाही मासे पकडण्यासाठी जेवढी चोच काढत नाही,
तेवढी आजकालच्या पोरी सेल्फीसाठी काढतात!
…
पुण्यातील साडीच्या दुकानाबाहेर लावलेली पाटी
१० मिनिटांत साडी पसंत केल्यास २० टक्के डिस्काउंट
…
पेशंट : डॉक्टर, माझा उजवा पाय खूप दुखतोय.
डॉक्टर : वयानुसार हे सगळं होणारच
पेशंट : पण, डॉक्टर माझा डावा पाय सुद्धा तेवढ्याच वयाचा आहे, मग उजवाच का दुखतोय?
डॉक्टरची बोलती बंद!
…
पप्पा - बाळा, मोठी होऊन तू काय करणार?
मुलगी - लग्न करणार पप्पा
पप्पा - वाईट सवय बाळा. आतापासूनच कुणाचं वाईट चिंतू नये.
…
एका बागेतील बाकड्यावर बसलेल्या सुंदर मुलीला पाहून भिकारी म्हणाला,
हाय डार्लिंग कशी आहेस?
मुलगी भडकली! तुझी हिंमत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची?
भिकारी - तू ज्या बाकड्यावर बसलीयस, तो माझा बेड आहे.
(मुलगी बेशुद्ध)