Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
सकाळी ६ वाजताचा लावलेला अलार्म
५ वाजून ५८ मिनिटांनी उठून बंद केल्यावर
असं वाटतं जणू एखादा बॉम्ब निकामी केलाय!
…
बायको - तुम्हाला माझं सौंदर्य जास्त आवडतं की माझे संस्कार?
नवरा - खरंतर, मला तुझी ही जोक करण्याची सवय खूप आवडते.
…
बायको - तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे.
नवरा - शहाजहाँइतकं
बायको - मग माझ्यासाठी ताजमहल बनवा!
नवरा - जमीन घेऊन ठेवलीय. तुझ्या मरणाची वाट बघतोय.
…
बायको - जरा किचनमधून बटाटे आणता का?
नवरा - (किचनमध्ये जातो) अगं इथं तर बटाटे दिसत नाहीत
बायको - तुमच्यानं एक काम धड होणार नाही. तुम्हाला कामाची कुठली गोष्ट कधीच सापडत नाही.
मला माहीत होतं. म्हणून मी आधीच बटाटे घेऊन आले होते.
आता यात नवऱ्याचं काय चुकलं, तुम्हीचा सांगा!