marathi jokes : ध्वजारोहणासाठी नटून-थटून निघालेल्या नवऱ्याला बायको जेव्हा टिप्स देते…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : ध्वजारोहणासाठी नटून-थटून निघालेल्या नवऱ्याला बायको जेव्हा टिप्स देते…

marathi jokes : ध्वजारोहणासाठी नटून-थटून निघालेल्या नवऱ्याला बायको जेव्हा टिप्स देते…

HT Marathi Desk HT Marathi
Published Aug 15, 2024 10:08 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : ध्वजारोहणासाठी नटून-थटून निघालेल्या नवऱ्याला बायकोनं दिल्या टिप्स
marathi jokes : ध्वजारोहणासाठी नटून-थटून निघालेल्या नवऱ्याला बायकोनं दिल्या टिप्स

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

तुमच्या हस्ते ध्वजारोहण आहे म्हणून

उगाच बढाया मारत बसू नका.

भाषण ठोकीत बसू नका.

दळण आणायचं आहे.

रद्दी विकायची आहे.

छत्री दुरुस्त करून आणायची आहे.

स्वातंत्र्य देशाला मिळालंय, तुम्हाला नाही.

बायका संवेदनशील असतात हेच खरं.

त्या मानाने पुरुष फारच कठोर असतात.

बायकांना इतरांची, विशेषत: महिला वर्गाची मोठी काळजी असते.

हेच बघा ना,

दोन बायका एकत्र आल्या की स्वत:ची सगळी दु:खं विसरून तिसऱ्या बाईची चिंता करतात. तिच्याबद्दल बोलतात.

गुरुजी - तुझी हजेरी कमी आहे. तू परीक्षेला बसू शकत नाहीस.

बंड्या - काही हरकत नाही गुरुजी.

मला अजिबात घमेंड नाही.

मी उभ्यानंच पेपर लिहीन.

(गुरुजी शाळा सोडून गेले)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner