marathi jokes : सहज पचेल असा हलका-फुलका पदार्थ कसा ओळखायचा? हे वाचा!-joke of the day viral marathi jokes marathi short jokes jokes on husband wife jokes on teacher student chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : सहज पचेल असा हलका-फुलका पदार्थ कसा ओळखायचा? हे वाचा!

marathi jokes : सहज पचेल असा हलका-फुलका पदार्थ कसा ओळखायचा? हे वाचा!

HT Marathi Desk HT Marathi
Aug 13, 2024 10:30 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : सहज पचेल असा हलका-फुलका पदार्थ कसा ओळखायचा? हे वाचा!
marathi jokes : सहज पचेल असा हलका-फुलका पदार्थ कसा ओळखायचा? हे वाचा!

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

पावसात पचेल असा हलका आहार घ्यावा.

हा आहार नेमका कुठला हे समजायला खूप सोप्पं आहे.

उदाहरणासह पाहूया

पाणी हे पचायला सर्वात हलकं असतं

त्या पाण्यावर तेल टाकलं की तरंगतं. 

याचा अर्थ तेल पाण्यापेक्षा हलकं आहे.

त्या तेलात भजी टाकली तर तीही तरंगते

याचा अर्थ भजी तेलापेक्षा हलकी असते.

शेवटी काय तर भजी पचायला सगळ्यात हलकी असते

.

.

तर मंडळी, पावसात भरपूर भजी खा!!

एका फ्लॅटची बेल वाजते,

घरात एकटी असलेली बाई दार उघडते…

भिकारी - माई, भिक्षा वाढा.

बाई - घ्या महाराज...

भिकारी - माई… दरवाजातून बाहेर येऊन भिक्षा देता का?

ती बाई उंबरठा ओलांडून बाहेर येते.

भिकारी (तिला धरून हसायला लागतो) हाहाहा...

मी भिकारी नाही, मी रावण आहे!

बाई - हा...हा...हा...

मी तरी कुठं सीता आहे, मी कामवाली बाई आहे.

जोक संपलेला नाही…

रावण - हा..हा..हा..

सीतेचं अपहरण केल्याचा मला अजूनही पश्चाताप होतोय. 

तिला नेलं तेव्हा मंदोदरी वैतागली होती. तुला बघून खूष होईल.

तिलाही मोलकरीण पाहिजे.

बाई - हा...हा...हा...

मूर्खा, सीतेला शोधायला फक्त प्रभू राम आले होते.

मला शोधायला आख्खी सोसायटी येईल.

अजून सगळ्यांची गणपतीची साफसफाई बाकी आहे.

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग