Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
मिस्टर इंडिया सिनेमातील मोगॅम्बो दर काही मिनिटाला ‘खूश हुआ… खूश हुआ…’ असं का म्हणायचा?
यावर अनेक वर्षे संशोधन सुरू होतं
शेवटी आज ते सत्य समोर आलंच!
.
.
त्याचं लग्न झालं नव्हतं!
…
आपल्या देशात अरबी बोलली जात नाही, फक्त खाल्ली जाते.
चायनीज बोलली जात नाही, खाल्ली जाते.
त्याचप्रमाणे इंग्रजीही फारशी बोलली जात नाही, प्यायली जाते!
…
सरकारनं आग्र्याच्या ताजमहालात पानमसाला आणि गुटखा खाण्याची परवानगी दिली तर,
आई शप्पथ!
हे गुटखा खाणारे ताजमहालाला लाल किल्ला बनवून टाकतील!