Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एखाद्या मुलीला आय लव्ह यू मेसेज पाठवल्यानंतर उत्तर मिळत नाही तेव्हा…
ऑस्ट्रेलियन तरुण - कदाचित तिला माझ्यात इंट्रेस्ट नसेल.
जपानी तरुण - विचार करायला वेळ हवा असेल.
रशियन तरुण - कदाचित प्रत्यक्ष भेटल्यावर सांगेल.
भारतीय तरुण : पुन्हा मेसेज करतो… तो तुम्हारी खामोशी को मै हां समजू…
…
भारतात जोपर्यंत एखादा तरुण स्वत:च्या पायावर उभा राहतो,
तोपर्यंत त्याच्या प्रेयसीचा मुलगा धावायला लावतो.
…
मुलगा - Whatsapp अपडेट कर…
मुलगी - कसं करू?
मुलगा - Play Store मध्ये जा आणि तिथून कर.
मुलगी - आमच्या गावात प्ले स्टोअर नाही, जनरल स्टोअर आहे, तिथं जाऊन करू का?
संबंधित बातम्या