Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
अनेक वर्षापूर्वी मी एक साधू मला भेटला होता…
तो म्हणाला होता की बाळा, एक दिवस तुझ्याकडं इतकं काही येईल की तू स्वत:कडं ठेवू शकणार नाहीस!
तू ते सगळ्यांना वाटत सुटशील, तरीही ते संपणार नाही…
आज इतक्या वर्षांनंतर मला समजलं की,
ते Whatsapp मेसेजबद्दल बोलले होते!
…
स्वर्गानंतर व्हॉट्सअॅप आणि फेसबुक हीच एक अशी जागा आहे जिथं…
.
.
.
प्रत्येक बाई अप्सरा वाटते!
…
जेवल्यावर लगेच झोपू नये…
मग काय करायचं?
थोडावेळ व्हॉट्सअॅपवर राहिलं पाहिजे!