Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पहिल्या शिट्टीमध्ये स्त्रीचे लक्ष वेधून घेण्याची,
दुसऱ्या शिट्टीमध्ये तिला लक्ष देण्यास भाग पाडण्याची आणि
तिसऱ्या शिट्टीमध्ये स्वत:जवळ बोलावण्याची ताकद फक्त
प्रेशर कुकरमध्ये असते.
…
ज्याला बायको डोकेदुखी वाटते,
त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की…
ती स्वत: तुमच्याकडं आली नव्हती.
तुम्हीच वऱ्हाड घेऊन वाजतगाजत तिला आणायला गेला होता…
…
एक मुलगी रेस्टॉरंटमध्ये जाते…
वेटर धावतच टेबलजवळ येतो आणि विचारतो…
मॅडम काय घेणार?
ग्रीन टी की ब्लॅक टी?
मुलगी - दुसरा एखादा कलर नाही का? गुलाबी वगैरे…