Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
रागानं लालबुंद झालेल्या एका बाईनं इंटरनेट पुरवणाऱ्या कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला…
तणतणतच ती म्हणाली, तीन तास झाले तुमच्या कंपनीचं इंटरनेट चालत नाही.
एवढे पैसे देऊन काय फायदा?
आता तुम्हीच सांगा मी काय करू?
समोर फोनवर एक माणूस होता,
त्यानं काळजाला भिडणारं उत्तर दिलं…
बाई, तेवढ्या वेळात घरातलं एखादं कामं करा!
…
एक मुलगी कपड्याच्या शोरूममध्ये गेली!
मुलगी - भाऊ हा ड्रेस परत करायचा आहे.
दुकानदार - काय झालं ताई, तुम्हाला रंग आवडला नाही की डिझाइन आवडली नाही?
मुलगी - तसं काही नाही भाऊ
काल मी हा ड्रेस घालून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं होतं.
पण एकही लाइक मिळाला नाही!
…
नवरा : आज तुझा उपवास आहे ना?
बायको : हो
नवरा: काही खाल्लंस का?
बायको : हो
नवरा : काय?
बायको: सकाळी उठून चहा प्यायले. नंतर केळी, डाळिंब, शेंगदाणे, फ्रूट क्रीम, बटाटा टिक्की, साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा पापड, काकडी खाल्ली. आता ज्यूस घेतेय.
.
.
नवरा - खूप कडक उपवास ठेवलायस.
सगळ्यांनाच हे जमत नाही.
दुसरं काही खायची इच्छा आहे का?
काळजी घे नाहीतर अशक्तपणा येईल!