Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
आजकाल एक यशस्वी गृहिणी तीच समजली जाते जी...
सगळं काही लवकर आटोपून नवऱ्याला टिफिन देते आणि ऑफिसला पाठवते!
आणि मग... मोबाइल घेऊन बसते!
…
मोबाइलवर असताना मी खूप क्यूट दिसते.
माझ्या घरातले सगळे लोक माझ्याकडंच बघत राहतात!
…
लग्नानंतर मुलगी पहिल्यांदाच आई-वडिलांच्या घरी आली.
आईनं तिला प्रेमानं मिठी मारली आणि विचारलं…
बाळा, सर्व काही ठीक आहे ना? तू खूश तर आहेस ना?"
मुलगी - हो आई, मी खूप खूश आहे.
माझ्या सासरचे लोक खूप साधे आहेत.
तुला माहीत आहे का, त्या लोकांना घड्याळ सुद्धा समजत नाही.
रोज सकाळी ९ वाजता सासू आणि नणंद मला उठवते आणि विचारते,
घड्याळात बघ किती वाजलेत ते!