marathi jokes : हुशार बायका लग्नातला फोटो कायम जपून ठेवतात, कारण…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : हुशार बायका लग्नातला फोटो कायम जपून ठेवतात, कारण…

marathi jokes : हुशार बायका लग्नातला फोटो कायम जपून ठेवतात, कारण…

HT Marathi Desk HT Marathi
Updated Aug 05, 2024 09:35 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : हुशार बायका लग्नातला फोटो कायम जपून ठेवतात, कारण…
marathi jokes : हुशार बायका लग्नातला फोटो कायम जपून ठेवतात, कारण…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

वहिनी बँकेत गेल्या आणि म्हणाल्या...

मला जॉइंट अकाऊंट उघडायचं आहे

बँक कर्मचारी - कोणासोबत? तुमच्या नवऱ्यासोबत का?

वहिनी - नाही, ज्याच्या अकाऊंटमध्ये खूप पैसे आहेत, त्यांच्यासोबत.

(बँक कर्मचारी बेशुद्ध)

गावातल्या दोन बायका आपसात बोलत असतात…

पहिली बाई - अगं तुला माहीत आहे का, आपल्या गावचा सरपंच कोमात गेलाय.

दुसरी बाई - हो का? गेले असतील बाई. 

पैसेवाली माणसं कुठंही जाऊ शकतात.

आपल्यासारख्या गरिबांसाठी तर गावच सगळं आहे.

हुशार बायका लग्नातला मेकअपचा फोटो तसाच जपून ठेवतात.

नवऱ्याशी भांडण झालं की मुलांना दाखवता आणि म्हणतात...

बघ बाळा... मी कशी होते आणि तुझ्या वडिलांनी माझे काय हाल केलेत!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner