Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पत्नी : कसा झालाय चहा?
पति : छानच ... मस्तच...
पत्नी : पण आपले चिरंजीव तर म्हणतायत बेकार झालाय!
पति : लहान आहे तो, लग्न झाल्यावर कळेल त्याला.
…
एका बेरोजगार तरुणाची मुलाखत घेत असताना कंपनी व्यवस्थापकानं विचारलं की…
तुम्हाला सायकल चालवायला जमते का?
तरुण माणूस (मॅनेजरला) - होय.
मॅनेजर (तरुणाला)- तुम्ही कधी विमान उडवलंय का?
तरुण माणूस (मॅनेजरला) - हो. दोन-तीन वेळा
मॅनेजर (तरुणाला) - तुम्हाला कंपनीत सेल्समन म्हणून नियुक्त केला जाईल, पण कधी खोटं बोलायची गरज पडली तर बोलू शकाल का?
तरुण माणूस (मॅनेजरला) - एवढा वेळ मी काय बोलतोय?
…
काय जमाना आलाय?
नजर लागण्यापासून वाचवणाऱ्या गोष्टींनाच नजर लागलीय!
हिरवी मिरची २०० किलो झालीय आणि
एक लिंबू १० रुपये
…
हल्लीचा जमानाच वेगळा आहे.
स्पर्धा इतकी वाढलीय की…
एखाद्याला तुम्ही तुमचं दु:ख सांगितलं तर तो तुमच्यापेक्षा डबल सांगतो.
संबंधित बातम्या