Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
वर्गात हिंदीचा तास सुरू असतो…
बंड्या - गुरुजी, 'कोतड पाना' शब्दाचा अर्थ काय?
गुरुजी - कोणत्या भाषेतला शब्द आहे हा
जमल: हिंदी भाषेतलाच आहे!
गुरुजी - हिंदी भाषेत असा कुठलाही शब्द नाही!
.
.
बंड्या - आहे गुरुजी. मी टीव्हीवर एक गाणं पाहिलं होतं, त्यात हा शब्द होता
गुरुजी - कुठलं गाणं?
बंड्या - कांची रे कांची रे… या गाण्यात मध्ये एक ओळ आहे.
झूठा है ये गुस्सा तेरा सच्चा नही
सच्चे प्रेमी कोतड पाना अच्छा नही…
.
.
.
(गुरुजींनी बंड्याला तुडव तुडव तुडवला!)
…
Activa वरून घरी जाताना मी Royal Stag ची बाटली विकत घेतली आणि घरी जायला लागलो.
अचानक माझ्या मनात विचार आला की वाटेत ॲक्टिव्हा पडली आणि बाटली फुटली तर काय करायचं?
ॲक्टिव्हा थांबवली, बाटली बाहेर काढली आणि तिथंच पूर्ण बाटली खाली केली!
तुम्हाला विश्वास बसणार नाही, माझा निर्णय योग्य ठरला!
घरी जाईपर्यंत मी चार वेळा पडलो…
संबंधित बातम्या