Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बायको जेवण बनवत असते!
भात, भाजी बनवून मग चपात्या बनवायला सुरुवात करते.
लाटणं घेतलेल्या हातानं नवऱ्याला विचारते…
तुम्ही आज दोन खाणार की तीन?
नवरा - भाकरी की चपाती हे स्पष्ट बोलत जा ना
उगीच गैरसमज होतो!
…
एक माणूस रोज तिच्या मेलेल्या बायकोच्या थडग्यावर जाऊन रडतो.
अत्यंत प्रेमानं तिच्या थडग्याला हवा घालत असतो
हे पाहून एकजण म्हणतो,
प्रेम असावं तर असं
हे ऐकून माणूस म्हणतो,
माझी बायको म्हणाली होती, माझ्या थडग्यावरची माती सुकल्यावर दुसरं लग्न कर
पण कोण रोज येऊन दोन बादल्या पाणी ओततं काय माहीत?
…
सर्वसाधारण पुरुष तिच्या बायकोला म्हणतो,
कधी तरी तुझं तोंड बंद ठेवत जा!
पण हुशार नवरा नेहमी त्याच्या बायकोला म्हणतो,
तुझ्या ओठांच्या पाकळ्या जेव्हा मिटलेल्या असतात, तेव्हा तू कमालीची सुंदर दिसतेस!
संबंधित बातम्या