marathi jokes : कोमात गेलेल्या बायकोला वाचवण्यासाठी नवरा जेव्हा डॉक्टरकडे गयावया करतो…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : कोमात गेलेल्या बायकोला वाचवण्यासाठी नवरा जेव्हा डॉक्टरकडे गयावया करतो…

marathi jokes : कोमात गेलेल्या बायकोला वाचवण्यासाठी नवरा जेव्हा डॉक्टरकडे गयावया करतो…

HT Marathi Desk HT Marathi
Updated Jul 30, 2024 09:30 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : कोमात गेलेल्या बायकोला वाचवण्यासाठी नवरा जेव्हा डॉक्टरकडे गयावया करतो…
marathi jokes : कोमात गेलेल्या बायकोला वाचवण्यासाठी नवरा जेव्हा डॉक्टरकडे गयावया करतो…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

एका माणसाची बायको ICU मध्ये असते…

नवरा खचून जातो. त्याला अश्रू आवरत नाहीत.

डॉक्टर त्याला धीर देतात. आम्ही आहोत. आम्ही सगळे प्रयत्न करतोय. पण कशाचीही खात्री देता येत नाही.

ती कोमात गेलीय!

नवरा : प्लीज डॉ. तिला वाचवा. 

तिचं वयच काय आहे. फक्त ३१ वर्षांची आहे..

आम्हाला एक मूल आहे. कुटुंबाला तिची गरज आहे.

आम्ही अनेक स्वप्नं एकत्र पाहिली. त्याचा गळा दाटून आला

.

.

.

अचानक काहीतरी घडलं, चमत्कार झाला!

ECG मध्ये काही हालचाल जाणवली. तिचे हात हलू लागले,

ओठ थरथरू लागले, हळूच तिनं डोळे उघडले आणि दबक्या आवाजात म्हणाली,

मी २९ वर्षांची आहे.

हेही वाचा : लहानपणी पाहिलेल्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होतं तेव्हा…

बायको खूप प्रेमानं म्हणाली, या तुमच्या डोक्याला तेल लावू दे.

हे ऐकून नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

तो आनंदानं येऊन तिच्या पुढ्यात बसला

बायकोनं डोक्यावर तेल सोडलं आणि निघून गेली

नवऱ्यानं विचारलं, हे काय? लवकर ये, तेल डोक्यावरून खाली येतंय.

ती म्हणाली,

आज शनिवार आहे, भटजी बुवा म्हणाले, तुमच्या लग्नाच्या दिवसापासून शनि तुमच्यावर वक्री झालाय. 

तुमच्या आवडत्या देवतेला तेल अर्पण करा.

तुम्हीच माझं मंदिर, तुम्हीच माझी पूजा, तुम्हीच माझा देव… हे गाणं आठवतं का? 

म्हणून तुमच्याच डोक्यावर तेल ओतलं!

नवरा मनात म्हणाला, नशीब नारळ फोडायला सांगितला नाही.

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner