Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
लहान असताना मी खूप स्वप्ने पाहिली होती...
जेव्हा मी ४० वर्षांचा होईन तेव्हा माझ्याकडं माझा मोठा बंगला असेल
फेरारी कार असेल, एक मोठे फार्महाऊस असेल
५ ते १० कोटी रुपये बँक बॅलन्स असेल.
माझ्या खास मित्रांसह मी जगाची टूर करीन वगैरे वगैरे
आतापर्यंत त्यातलं फक्त एक स्वप्न पूर्ण झालंय…
ते म्हणजे
.
.
.
.
.
मी ४० वर्षांचा झालोय.
…
पूर्वीच्या काळी एखादी जखम झाली तर,
लोक त्यावर हळद किंवा चुना लावायचे.
आताचे लोक स्टेटस लावतात!
…
बायकोची तब्येत खूपच खराब होती… एकदम शांत पडून होती…
त्यामुळं नवरा हैराण झाला होता
तितक्यात त्याला आयडिया सुचली
त्यानं बायकोच्या घरच्यांबद्दल वाईट-साईट बोलणं सुरू केलं.
ते ऐकून बायको नेहमीसारखी चवताळून भांडायला लागली.
तिचं हे रूप पाहून नवऱ्याची चिंता मिटली!
संबंधित बातम्या