marathi jokes : सकाळी आठ वाजून गेले तरी सून झोपलेली आहे हे जेव्हा सासू बघते…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : सकाळी आठ वाजून गेले तरी सून झोपलेली आहे हे जेव्हा सासू बघते…

marathi jokes : सकाळी आठ वाजून गेले तरी सून झोपलेली आहे हे जेव्हा सासू बघते…

HT Marathi Desk HT Marathi
Updated Jul 26, 2024 09:53 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : सकाळी आठ वाजून गेले तरी सून झोपलेली आहे हे जेव्हा सासू पाहते…
marathi jokes : सकाळी आठ वाजून गेले तरी सून झोपलेली आहे हे जेव्हा सासू पाहते…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

सासूबाई सकाळी लवकर उठतात…

सून अजून झोपलीय हे पाहून मनातच धुमसत बसतात.

तेवढ्यात त्यांना मुलगा दिसतो… मग त्या संधी साधतात

अजून कुंभकर्णासारखी झोपलीय

उठवा जरा मॅडमना, सूर्य कधीच उगवलाय सांगा!

सासूबाईंचा हा टोमणा सून ऐकते आणि शांतपणे म्हणते…

थंड व्हा सासूबाई, सूर्य झोपतो माझ्या आधी

(आता मुलाची खैर नाही)

बाबा मुलाला अनुभवाचे बोल सांगत असतात!

बाबा - हे बघ बाळा, आयुष्यात कधीही ही जुगार खेळू नकोस. ही अशी सवय आहे की आज जिंकलास तर उद्या हरशील, परवा जिंकलात तर तेरवा हराल. 

मुलगा - समजलं बाबा! यापुढं मी दिवसाआड जुगार खेळेन!

गुरुजी - चला उभा राहा, मी इथं शिकवतोय आणि तू बिनधास्त हसतोयस 

गुरुजी - एवढं हसायला काय झालं? बाकीच्यांनाही सांग, त्यांनाही हसू दे.

मुलगा - गुरुजी, हा तुम्हाला 'काळं वांगं' म्हणाला!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner