Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
आजचं ज्ञानामृत
खरं प्रेम हे भूतासारखं असतं…
चर्चा सगळे करतात, पण
दिसत कोणालाच नाही!
…
हल्ली लोक खूप मतलबी झालेत.
एखाद्याकडं पेन मागितला तर टोपण काढून स्वत:कडं ठेवतात.
माझ्याकडं टोपण नसलेले असे १६ पेन जमा झालेत.
…
घरच्यांच्या नजरेत तुम्ही कितीही नालायक आणि बिनकामाचे असा,
निवडणूक आयोगाचे लोक तुम्हाला नेहमी आदर देतात.
तुम्ही जबाबदार नागरिक असल्याचं सांगतात.
…
गुरुजी : तू तुझा गृहपाठ का केला नाहीस?
पप्पू - गुरुजी, घरी लाईट नव्हती.
शिक्षक - मग मेणबत्ती पेटवायची होती.
पप्पू- सर, माचिस नव्हतं
शिक्षक - का
पप्पू - देवघरात ठेवलं होतं.
शिक्षक - तिथून घ्यायचंस ना
पप्पू - मी अंघोळ केली नव्हती
शिक्षक - अंघोळ का केली नाहीस?
पप्पू - पाणी नव्हतं सर
शिक्षक - पाणी का नव्हतं?
पप्पू - गुरुजी, मोटर चालत नव्हती.
शिक्षक : अरे, मोटर का चालत नव्हती?
पप्पू- सर, आधीच सांगितलं ना की लाईट नव्हती!
संबंधित बातम्या