marathi jokes : अविवाहित लोकांनी लग्न झालेल्या लोकांशी कमीच बोलावं, कारण…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : अविवाहित लोकांनी लग्न झालेल्या लोकांशी कमीच बोलावं, कारण…

marathi jokes : अविवाहित लोकांनी लग्न झालेल्या लोकांशी कमीच बोलावं, कारण…

HT Marathi Desk HT Marathi
Published Jul 23, 2024 10:28 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : अविवाहित लोकांनी लग्न झालेल्यांशी कमीच बोलावं, कारण…
marathi jokes : अविवाहित लोकांनी लग्न झालेल्यांशी कमीच बोलावं, कारण…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

एका तरुण एका सुंदर बाईला म्हणाला…

मी तुमच्या प्रेमात पडलो आहे. मला तुमच्यासोबत आयुष्य घालवायचं आहे.

माझ्याशी लग्न कराल का?

सध्या तरी मी काही करत नाही. माझ्याकडं फार पैसे नाहीत. 

पण माझे बाबा शेवटच्या घटका मोजत आहेत…

ते गेले की मी ३०० कोटींचा मालक होईन…

बाई त्याच्या बोलण्यानं प्रभावित झाली. तिनं त्याच्याकडं कार्ड मागितलं.

एका महिन्यानंतर ती बाई त्या तरुणाची सावत्र आई झाली!

एका तरुणाचं शेजारच्या बाईशी प्रेमप्रकरण होतं.

एक दिवस संधी साधून तो तिला पळवून घेऊन गेला.

रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी त्यानं रिक्षा पकडली. 

स्टेशनवर पोहोचल्यावर भाडं देण्यासाठी त्यानं पाकीट उघडताच रिक्षावाला म्हणाला,

काही गरज नाही.

हिच्या नवऱ्यानं भाडं आधीच दिलंय!

अविवाहित लोकांनी लग्न झालेल्या लोकांशी शक्यतो बोलू नये.

हे लोक प्रचंड नकारात्मक असतात.

लग्नाचे फायदे कमी आणि तोटेच जास्त सांगतात!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner