Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
वर्गात हिंदीचा तास चालू असतो…
गुरुजी मुलांना सांगतात, 'भाईचारा' हा शब्द वापरून एक वाक्य बनवा!
बंड्या : मी दूधवाल्याला विचारले, तू दूध इतकं महाग का विकतोस? तर तो म्हणाला, भाई चारा महाग झालाय.
(गुरुजींनी राजीनामा दिल्याचं कळतंय)
…
आग्र्याच्या ताजमहलात गुटखा खाण्याची परवानगी मिळाली तर…
आई शप्पथ सांगतो,
हे गुटखा खाणारे ताजमहलला लाल किल्ला बनवून टाकतील!
…
महागडे कपडे घातले म्हणून कोणी मोठा होत नाही.
माणूस मोठा तेव्हाच होतो, जेव्हा त्याचे जुने कपडे त्याला तोकडे पडायला लागतात!
…
चांगले शेजारी मिळणं हा नशिबाचा भाग असतो. कटकटे शेजारी मिळाले की त्रास ठरलेलाच!
आता हेच बघा ना! काल रात्री २ वाजता आमचे शेजारी येऊन जोरजोरात आमचा दरवाजा वाजवायला लागले
२ वाजता एखाद्याचा दरवाजा ठोकायचा हे त्यांना शोभतं का?
एक बरं झालं की मी तेव्हा जागाच होतो.
ढोलकी वाजवायची प्रॅक्टिस करत होतो!
संबंधित बातम्या