Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एका माणसाला त्याचा सासरा भर रस्त्यात चपलीनं मारत होता.
ते पाहून एकाला राहावलं नाही. तो म्हणाला,
काका, का मारताय बिचाऱ्याला?
सासरा: मी हॉस्पिटलमधून त्याला व्हॉट्सॲप मेसेज केला, की तू बाप झालास म्हणून…
तर ह्या महाभागानं तो मेसेज ५० लोकांना फॉरवर्ड केला.
…
एक काळ असा होता की, थोरामोठ्यांच्या पायाला हात लावून त्यांचा आदर केला जाई.
मग मोठे लोक आशीर्वाद देत
आजकाल पायाला हात लावायची गरज नाही.
कुणी आपल्या घरी आल्यावर मोबाइल बाजूला ठेवला तरी त्याचा खूप मोठा सन्मान होतो.
…
मला वाटायचं व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्रामचा आजार फक्त मलाच आहे.
तुम्हाला पाहिल्यावर कळलं ही तरी महामारी आहे
संबंधित बातम्या