Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
महाराजांचा सत्संग सुरू असतो…
श्रोते तल्लीन होऊन ऐकत असतात!
महाराज - या जन्मी जो पुरुष आहे, तो पुढच्या जन्मी सुद्धा पुरुषच राहील!
आणि या जन्मी जी स्त्री आहे, ती पुढच्या जन्मी देखील स्त्री म्हणूनच जन्माला येईल!
हे ऐकून एक सुंदर महिला उठली आणि निघून जाऊ लागली!
महाराज - कुठे चालला आपण?
बाई - घरी चालले. पुढच्या जन्मातही भाकरीच करायच्या असतील तर सत्संग करून फायदा काय?
…
एका साडीच्या दुकानाबाहेर बोर्ड लावला होता…
१० मिनिटांच्या आत साडी पसंत केल्यास, २० टक्के डिस्काउंट
(स्थळ सांगायला पाहिजे का?)
…
एक तरुण मुलगी मंदिरात गेली आणि देवापुढं हात जोडून म्हणाली…
देवा, मी माझ्यासाठी मागत नाही! फक्त एवढंच कर, माझ्या आईला एक सुंदर जावई दे!!!
मुलीला प्रार्थनेचं उत्तर मिळालं…
त्याच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं!
बोध - देवासमोर ओवर अॅक्टिंग करू नका!
संबंधित बातम्या