Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक बाई (दुसऱ्या बाईला) म्हणते,
माझ्याकडे कार आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे, तुमच्याकडे काय आहे?
दुसरी बाई (अत्यंत शांत आवाजात) - माझ्याकडे २० वर्षांपूर्वी माझ्या लग्नासाठी तयार केलेला सूट आहे, तो अजूनही मला फीट बसतो.
(पहिली बाई आता जिमला जाते)
…
बाई हॉटेलात जातात आणि पिझ्झा ऑर्डर करतात!
वेटर विचारतो, मॅडम पिझ्झाचे किती पीस करू?
चार की आठ?
बाई - चारच करा. मी सध्या डायटिंगवर आहे.
…
आता कुकर बनवणाऱ्या कंपन्यांपुढं नवं आव्हान उभं राहिलं आहे.
महिलांकडून मागणी आहे की कुकर असा असावा की जो शिट्ट्या वाजवताना १, २, ३ असे आकडेही बोलेल.
कारण, व्हॉट्सॲप, फेसबुक यातून शिट्ट्यांवर लक्ष ठेवायला वेळ कुठं मिळतो?
संबंधित बातम्या