Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एका डॉक्टरला रात्री अचानक जाग आली. तो टॉयलेटला गेला तेव्हा कळलं की टॉयलेट चोक-अप झालंय.
तो बायकोला म्हणाला, मी आत्ताच प्लंबरला बोलवतो!
बायको म्हणाली, रात्री तीन वाजता प्लंबरला फोन करू नका.
डॉक्टर - मग काय झालं? एखादा माणूस आजारी पडला की आम्ही रात्री-अपरात्री जातोच ना!
असं म्हणून त्यानं प्लंबरला फोन केला, तक्रार केली आणि लगेच यायला सांगितलं.
प्लंबर का-कू करत होता. त्यावर डॉक्टर म्हणाला, मी रात्री पेशंटला बघायला जाऊ शकतो तर तुम्ही का येत नाही?
शेवटी मध्यरात्री साडेतीन वाजता प्लंबर डोळे चोळत आला. डॉक्टरांनी त्याला टॉयलेट दाखवलं.
प्लंबर बाहेर गेला. तिथं त्याला काही औषधाच्या गोळ्या पडलेल्या दिसल्या.
त्यानं टॉयलेटमध्ये दोन गोळ्या टाकल्या आणि डॉक्टरला सांगितलं,
दर अर्ध्या तासाला एक बादली पाणी टाकत राहा!
काही फरक पडला नाही तर मला सकाळी पुन्हा फोन करा. एन्डोस्कोपी करून घेईन.
…
एक नेता डॉक्टरकडे जातो.
डॉक्टर त्याला तपासून नेमकं काय झालंय ते सांगतो.
नेता - डॉक्टर मला नेमकं काय झालंय ते माझ्या भाषेत समजावून सांगाल का?
डॉक्टर - ठीक आहे. ऐका!
माझ्या रिपोर्टनुसार तुमचा रक्तदाब घोटाळ्याच्या दिशेनं चालला आहे…
फुफ्फुसं खोटी आश्वासनं देत आहेत आणि
हृदय राजीनामा देण्याच्या तयारीत आहे.
संबंधित बातम्या