Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बायको तणतणतच घरात आली!
चेहरा पाहूनच नवऱ्यानं ओळखलं काहीतरी झालंय. पण त्यानं काही विचारायचं टाळलं!
बायकोच म्हणाली, भर बसमध्ये आज माझा अपमान झाला!
नवऱ्यानं खोटा राग आणून विचारलं,
काय झालं? कोणी अपमान केला तुझा?
मी स्टॉपवर उतरायला उठले तर कंडक्टर लगेच म्हणाला,
आता त्या बाईंच्या सीटवर तिघे जण बसा!
(हा किस्सा आठवला की नवरा अजून हसतो)
…
व्हॉट्सअॅपचा सर्वात मोठा फायदा कुठला?
खूप साऱ्या बायका आपसात बोलत असतात, पण
आवाज अजिबात येत नाही!
…
पसंतीचा कार्यक्रम असतो.
मुलगीवाले मुलाच्या घरी जातात, पण मुलगा कुठं दिसत नाही.
मुलीचे बाबा विचारतात, मुलगा कुठं आहे.
मुलाचे बाबा - आमचा पिंट्या मागच्या सात दिवसांपासून दिवाळीची साफसफाई करतोय.
हातपाय धुवून येईलच आता.
मुलगी - लगेच ओरडते, मला मुलगा पसंत आहे.
संबंधित बातम्या