Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
संतू एकदा न राहवून बायकोला म्हणाला,
तू क्षुल्लक गोष्टींवर किती पैसे उधळतेस!
हे ऐकून, बायको भडकली!
आणि तुम्ही उधळता ते चालतं!
संतू - मी कधी आणि कुठं पैसे उधळले?
बायको - इतकी वर्षे झाली एलआयसी भरताय, एक पैसा मिळाला का अजून?
(संतूनं स्वत:च्याच तोंडात मारून घेतलं)
…
एकदा एका व्यापाऱ्यानं दुबईच्या शेखला रक्त देऊन त्याचे प्राण वाचवले.
शेखनं खूश होऊन तिला मर्सिडीज कार गिफ्ट केली….
शेखला पुन्हा रक्ताची गरज लागली...
व्यापाऱ्यानं पुन्हा रक्त दिले...
यावेळी शेखनं त्याला फक्त लाडू दिले….
व्यापारी (रागाने)- यावेळी फक्त लाडू...?
शेख म्हणाला, आता माझ्या शरीरातही व्यापाऱ्याचं रक्त वाहतंय!
…
गल्लीतनं एकाचा आवाज आला…
४०० रुपयांत आयुष्यभर बसून खा!
मी आश्चर्यानं बाहेर बघायला गेलो
पाहिलं तर खुर्ची विकणारा ओरडत होता!
संबंधित बातम्या