Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
मला तर कधी-कधी निवडणूक आयोगवालेच माझे कुटुंबीय वाटतात, कारण…
घरचे लोक कायम मला नालायक आणि कुचकामी म्हणतात!
पण,
निवडणूक आयोगाचे लोक नेहमी जबाबदार नागरिक म्हणून प्रोत्साहन देतात!
…
गुरुजी - जगातली सर्वात पवित्र गोष्ट कोणती?
पप्पू - गुरुजी, मोबाईल
गुरुजी (रागाने) - ते कसं काय रे?
पप्पू - वॉशरूम, दवाखाना, स्मशानभूमी अशा कुठल्याही ठिकाणी जाऊन आल्यानंतरही मोबाईल थेट घरात, स्वयंपाकघरात अगदी देवळातही जाऊ शकतो!
(गुरुजींनी व्हीआरएस घेतली)
…
आजकाल आई-वडिलांना दोनच चिंता असतात!
इंटरनेटवर मुलगा काय डाऊनलोड करतोय आणि
मुलगी काय अपलोड करतेय ही
…
एक विद्यार्थी देवाकडं गेला आणि देवाचे आभार मानू लागला…
म्हणाला,
देवा, तुझे आभार कोणत्या शब्दात मानू?
एक रुपयाचा भाव डॉलरला ८० वर नेलास! पेट्रोल ९० रुपयांवर, दूधाचा ६० रुपयांवर आणि कांद्याचा भाव १०० रुपयांवर नेलास. पण,
पास होण्यासाठी अजूनही ३५ मार्क लागतात! तू मोठा दयाळू आहेस.
संबंधित बातम्या