Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
भावा-बहिणीचं नातंच वेगळं असतं…
एकमेकाला किडनी देतील, पण
.
.
.
टीव्हीचा रमोट देणार नाहीत!
…
एक माणूस चिंटूला विचारतो…
चिंटू, तुझ्या बाबांचं नाव काय आहे?
चिंटू - काका, अजून मी त्यांचं नाव ठेवलेलं नाही.
प्रेमानं पप्पा बोलतो!
…
आई मुलांना प्रेमळ दम देते…
जो मी सांगितलेलं सगळं ऐकेल, उलटं बोलणार नाही,
त्याला मी खूप गिफ्ट देईन…
मुलं एका सुरात म्हणतात, मग सगळे गिफ्ट पप्पांनाच मिळतील!
…
आमच्या काळात ३जी, ४जी, ५जी काही नव्हतं.
फक्त गुरुG होते
एक सणसणीत पडली की सगळं नेटवर्क यायचं!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या