Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
सकाळी पूजा झाली की लोक मोबाइलकडं असे धावतात जसं काय,
.
.
देवानं प्रसन्न होऊन OTP पाठवलाय!
…
कृपा करून अशा पोस्ट टाकू नका की
रिक्षाचालकाच्या मुलीनं रौप्य पदक जिंकलं…
रिक्षाचालकाचा मुलगा झाला IAS झाला…
रिक्षावाल्याच्या मुलीला मिळाले ९९ टक्के...
हे सगळं वाचून आमची मुलं त्रास देतायत
बाबा तुम्ही पण रिक्षा घ्या म्हणून...
…
आयुष्यात असं काही काम करा की…
.
.
पुन्हा कधी तुम्हाला कुणी काही काम सांगणार नाही!
…
गिऱ्हाईक : पप्पू, तुझ्या वडिलांचं गुलाबजामचं दुकान आहे...
तुझी इच्छा नाही होत का गुलाबजाम खायची?
पप्पू - इच्छा तर खूप होते काका, पण पप्पा गुलाबजाम मोजून ठेवतात म्हणून मग
मी फक्त ते चाटून परत ठेवतो…!
गिऱ्हाईक बेशुद्ध!!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या