Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एका पुणेकर माणसानं मिठाईचं दुकान उघडलं आणि जाहिरात दिली!
कामगार पाहिजे!
पात्रता - त्याला डायबेटिस असला पाहिजे!
…
माझ्या हातानं मोजून कपाटात ८५ हजार रुपये ठेवले होते.
आज मोजले तर ५८,००० रुपये निघाले.
थोडी चौकशी केली तेव्हा कळंल आमच्या मॅडम शॉपिंगला गेल्या होत्या!
तरीही मी भीत-भीत विचारलंच, यातले पैसे कमी कसे झाले?
आमच्या मॅडम म्हणाल्या, रोजचा पेपर वाचत नाही का?
रुपयाची किंमत रोज घसरतेय!
………
ऑनलाइन व्यवसायाच्या जबरदस्त यशामुळं मोठमोठे व्यापारी घाबरून गेलेत...
फक्त 'सुलभ शौचालय'वाले बिनधास्त आहेत. कारण…
कोणी माईचा लाल जन्माला आला नाही, जो त्यांच्या धंद्यात गडबड करू शकेल!