मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : प्रेयसी जर तुमच्याशी सतत भांडत असेल, तुमची अक्कल काढत असेल तर…

marathi jokes : प्रेयसी जर तुमच्याशी सतत भांडत असेल, तुमची अक्कल काढत असेल तर…

HT Marathi Desk HT Marathi
Jul 06, 2024 10:52 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : प्रेयसी जर तुमच्याशी सतत भांडत असेल, तुमची अक्कल काढत असेल तर…
marathi jokes : प्रेयसी जर तुमच्याशी सतत भांडत असेल, तुमची अक्कल काढत असेल तर…

Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

ट्रेंडिंग न्यूज

मुलगा: मला अशी मुलगी पाहिजे जी…

कष्टाळऊ असेल. तिची राहणी साधी असेल,

माझं घर-दार व्यवस्थित ठेवेल. आज्ञाधारक असेल.

मुलगी - एक दिवस माझ्या घरी ये, माझ्या मोलकरणीमध्ये हे सगळे गुण आहेत.

मुलगा: मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये काम करायचो,

मुलगी - अरे व्वा!

मुलगा - पण आता नोकरी सोडलीय.

 मुलगी : का? 

मुलगा : रोज सकाळी लवकर उठून पेपर कोण टाकणार?

तुम्हाला काहीच कळत नाही असं म्हणत असेल,

तुमचा सतत अपमान करत असेल,

तर समजून जा की…

तिनं मनातून तुम्हाला नवरा मानलंय!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

WhatsApp channel
विभाग