Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पत्नी म्हणजे काय?
जी कधीच कुठली चूक करत नाही…
तिला सर्वमान्य भाषेत पत्नी असं म्हणतात!
बाई : भैय्या, तू दुधात किती भेसळ करतोस, देवाला घाबर जरा
दूधवाला : भाभी, भेसळीचं तुम्ही बोलूच नका
तुमचा फेसबुकचा DP बघा आणि आत्ता आरशात जाऊन चेहरा बघा
देवाचं सोडा, स्वत:ला घाबराल.
उलट मी फेसबुकवरच कमेंट केली नाही त्याबद्दल आभार माना!
…
एक बाई बँकेत गेल्या आणि काऊंटरवर जाऊन क्लार्कला म्हणाल्या,
मला एक जॉइंट अकाऊंट उघडायचं आहे!
क्लार्क - कोणासोबत? नवऱ्यासोबत का?
बाई : नाही, ज्याच्या खात्यात खूप पैसे आहेत त्याच्यासोबत
(क्लार्कनं व्हीआरएस घेतली)
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या