Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
आजचं ज्ञान
दुसऱ्याकडं एखादी गोष्ट जास्त असली तर लोक जळतात…
पण एकच गोष्ट अशी आहे जी दुसऱ्याकडं जास्त असली तरी त्याचा मत्सर वाटत नाही
कोणती?
.
.
.
.
ढेरी
…
एका कोंबडीनं बदकाशी लग्न केलं…
हे समजल्यावर तिच्या ओळखीतला एक कोंबडा भडकला
म्हणाला, आम्ही मेलो होतो का?
कोंबडी म्हणाली, लग्न मला तुझ्याशीच करायचं होतं, पण…
आईला नेव्हीमधला जावई पाहिजे होता!
…
पप्पूला सिगारेटचं व्यसन लागलं…
घरचे सगळे चिंतेत पडले!
पप्पूच्या बाबांच्या मित्रानं त्यांना एक सल्ला दिला…
म्हणाले, एखाद्या बाबाच्या योगा क्लासला पाठव
बाबांनी तसंच केलं.
आता पप्पू पायानं सुद्धा सिगारेट पितो!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या