Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
काल एका मित्राची तब्येत अचानक बिघडली.
त्याच्या घरच्यांनी त्याला आयसीयूमध्ये दाखल केला.
ही बातमी ऐकून मीही तिथं पोहोचलो.
मित्राला जाऊन भेटलो आणि विचारलं, काय झालं रे?
तो म्हणाला, काय सांगू, आज माझा मोबाइल खराब झाला म्हणून रात्री ८ वाजता जेवण केल्या-केल्या झोप लागली.
घरचे लोक घाबरले. रात्री २-२ वाजता झोपणारा हा आज लवकर कसा झोपला?
त्यांना वाटलं हा बेशुद्ध झाला?
म्हणून मला इथं घेऊन आले.
...
डॉक्टर - (ऑपरेशननंतर) तुम्ही उद्या तुमच्या घरच्यांना भेटू शकता.
पेशंट - पण डॉक्टर साहेब, माझ्या घरातील एकही माणूस जिवंत नाही.
डॉक्टर: मला माहीत आहे... म्हणूनच सांगतोय.
…
एक व्यक्ती डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली.
डॉक्टर - जर तुम्ही गर्दीपासून दूर राहाल तर लवकर बरे व्हाल.
पेशंट - काय करू डॉक्टर साहेब, नाईलाज आहे. आमचा व्यवसायच लोकांशी संबंधित आहे.
डॉक्टर - तुमचा व्यवसाय काय आहे?
.
.
.
पेशंट - मी पाकीटमार आहे.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)