Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक दारुड्या मेला आणि थेट स्वर्गात गेला!
फिरत फिरत शेवटी अकाऊंटस डिपार्टमेंटमध्ये पोहोचला!
तिथं त्यानं यमराजाला विचारलं, यमराज, मी रात्रंदिवस दारूच्या नशेत धुंद असायचो, तरी स्वर्गात कसा आलो?
तुमची काही चूक झाली आहे का प्रभू?
यमराजजी हसले आणि म्हणाले,
दारू प्यायल्यावर तू काहीच खायचा नाहीस, तसाच झोपायचास ना, ते आम्ही टेक्निकली उपवासात पकडतो.
मजा कर बाळा!
…
एका माणसाच्या तपश्चर्येनं प्रसन्न होऊन देव त्याला अमृत देतो…
पण देवाची ती ऑफर तो माणूस नाकारतो
देव - का बाळा? अमृताला तू नाही म्हणतोस?
माणूस - आत्ताच तंबाखू खाल्लीय, दादा!
…
संतू - अरे यार, तू iPhone 14 विकत घेतलास का?
अंतू - नाही रे, बॅटरीवरची स्कूटर घेतलीय.
ज्याच्याशी बोलायचं आहे, त्याच्या थेट घरी जाऊन बोलतो.
खर्च पण कमी होतो आणि चहा-नाश्ता पण मिळतो..!!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या