Viral Jokes In Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
काका - (बंड्याला विचारतात) मोकळ्या वेळात तू काय करतोस?
बंड्या - मोबाइलची बॅटरी चार्ज करतो काका!
काका - तुला मोकळा वेळ कधी मिळतो?
बंड्या - मोबाइलची बॅटरी संपली की…
(म्हणून शेजारच्या पोरांना नको ते प्रश्न विचारायचे नाहीत)
…
पप्पू - गुरुजी, राष्ट्रगीत सुरू असताना राष्ट्रीय पशू समोर आला तर,
सावधान अवस्थेत राहायचं की पळून जायचं?
(उत्तर शोधण्यासाठी गुरुजी रजेवर गेलेत)
…
शेजारचे काका चिंटूला विचारतात…
कसा होता तुझा आजचा इतिहासाचा पेपर
चिंटू - खूप अवघड होता, काका
साल्यांनी माझ्या जन्माच्या आधीचे प्रश्न विचारले होते
…
आयुष्यात तुम्ही किती चांगली कामं करा…
लोक त्याचीच आठवण काढतात, जो
उधार घेऊन मेलेला असतो!
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)
संबंधित बातम्या